संपन्न झालेले कार्यक्रम

जून २०१९
पुढील कार्यक्रम

सोमवार दिनांक १७ जून  २०१९  रोजी सन्मित्र मंडळ विद्यामंदिर (माध्यमिक विभाग) सकाळ अधिवेशनातील प्रथमदिनोत्सवाची सुरुवात सकाळी 6.55 पासून व दुपार अधिवेशनाची दु12.40 पासून उत्साहाने झाली. सर्व शिक्षक व मा मुख्याध्यापक विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ उभे होते. वातावरण निर्मितीसाठी ' हीच अमुची प्रार्थना 'हे सुमधुर गीत ऐकवण्यात आले. राष्ट्रगीत, शालेय प्रार्थना, प्रतिज्ञा,झाल्यानंतर शाळेचे मा. मुख्याध्यापक श्री गव्हाळे सरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. शालेय जीवनातील प्रगतीसाठी शिस्त, स्वच्छता , शालेय नियम तसेच अभ्यासातील सातत्य या गोष्टींचे महत्त्व समजावून दिले. मा. पर्यवेक्षका सौ. मोरे बाई यांनी "स्कूल चले " हे गीत ऐकवून विद्यार्थ्यांना उत्साहित केले. 
इ. ८ वी अ, ब मधील विद्यार्थ्यांना शासनाकडून प्राप्त झालेल्या शालेय पाठ्यपुस्तकांचे वितरण मा. मुख्याध्यापक श्री गव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आले. 
चार तासिकांनंतर मुलांना गोड खाऊ देऊन सोडण्यात आले. 
अशा प्रकारे सन्मित्र मंडळ विद्यामंदिर (गोरेगाव) येथील प्रथमदिनोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला.