संपन्न झालेले कार्यक्रम

जून २०१९
पुढील कार्यक्रम

आज दिनांक 25 जून 2019 रोजी वनराई पोलीस ठाण्यातील एटीसी (ATC ) विभागातील पीएसआय (PSI)श्री .आवटी ,तसेच श्री .थोरात,श्री .जगताप,श्री .मर्दे यांनी शाळेस भेट दिली .दुपारी 12.30 ते 1 या वेळेत पूर्व प्राथमिक ते माध्यमिक मधील मुख्याध्यापक ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,सुरक्षा रक्षक यांना मार्गदर्शन केले .कळंबोली परिसरात शाळेच्या आवारात घडलेला प्रसंग त्यांनी कथन केला .तशी घटना अथवा प्रसंग आपल्या हद्दीत घडू नये या दक्षतेसाठी ते शाळा भेटी करत असल्याचे त्यांनी सांगितले .शाळा अथवा शाळेच्या आवारात किंवा इतर ठिकाणी परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू ,व्यक्ती ,अथवा बॉम्बजन्य काही आढळल्यास कोणती खबरदारी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले .याव्यतिरिक्त सायबर गुन्ह्यांची उदाहरणे देऊन कशा प्रकारे फसवणूक केली जाते हे स्पष्ट केले .अशा वेळी कोणती खबरदारी घ्यावी ,एटीएम मधून रक्कम काढताना घ्यावयाची काळजी इत्यादींविषयी मार्गदर्शन केले .आम्ही विचारलेल्या शंकांचे निरसनही केले .पालकसभा अथवा विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी बोलवायचे असल्यास त्यांनी त्यांचे संपर्क क्रमांकही शाळेत देऊन ठेवले आहेत .अशा वेळी आम्ही व्हिडीओ क्लिप्स दाखवूनही मार्गदर्शन करू असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले .पर्यवेक्षिका मोरे बाईंनी शेवटी त्यांचे आभार मानले .