संपन्न झालेले कार्यक्रम

१३ ऑक्टोबर २०२० - फिलाटेली दिवस - शब्दांकन

दिनांक १ ते १५ ऑक्टोबर हा जागतिक पोस्टल आठवडा साजरा करण्यात येतो.

फिलाटेली दिवसाच्या निमित्ताने जीपीओ व सन्मित्र मंडळ विद्या मंदिर ह्यांनी मिळून गुगल मीट वर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचा विषय छंद जोपासणे व जनजागृती हा होता.दुपारी साडेबारा वाजता हा कार्यक्रम सुरु झाला. सन्मित्र शाळेतील इयत्ता सहावी ते नववी चे विद्यार्थी, पालक, शिक्षक ,पोस्टातील अधिकारी वर्ग मिळून कार्यक्रमाला 60 जण उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना सौ. रेखा मोरे ह्यांनी केली, तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. संस्थेचे खजिनदार व पालक मा. श्री अजित वर्तक यांनी पोस्टाशी बालपणापासून असलेले नाते आजही जवळीक निर्माण करते हे सांगितले, इंग्मंड लधील stamp collection संबंधी एक गमतीशीर किसा सांगितला व पोस्टाद्वारे घेण्यात आलेल्या दीनदयाळ शिष्यवृत्ती स्पर्धेत शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळवत आहेत त्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी माननीय श्रीमती स्वाती पांडे (postmaster general Mumbai region)

या उपस्थित होत्या. त्यांनी सुद्धा शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले. त्याच बरोबर मान्यवर श्री पराग रेडकर, मान्यवर श्री सायरस सिहवा, मान्यवर श्री उल्हास चौगुले, मान्यवर श्री गुरुनाथ शाह, तसेच मान्यवर श्री शैलेश कदम ( business executive, philateli bureau) उपस्थित होते.

नॅशनल फिलाटेली डे च्या निमित्ताने भारतीय टपाल खात्याच्या मुंबई कार्यालयाने स्टॅम्प मास्क केले आहेत. या मास्कवर टपाल तिकिटांच्या वेगवेगळ्या प्रतिमा छापल्या आहेत. सध्याच्या covid च्या काळात मास्क चे महत्व अधोरेखित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं.

मान्यवर श्री पराग रेडकर सर यांनी philately म्हणजे पोस्टाचे स्टॅम्प जमा करण्याचा छंद असे सांगितले. आत्ताच्या कारोनाच्या परिस्थितीवर मात करत गुगल मीट वर विशेष सभेचे आयोजन करून पोस्टाच्या विविध स्टॅम्प ची माहिती स्लाईड शो द्वारे दिली. स्टॅम्प चे वेगवेगळे प्रकार यामध्ये definative stamp,commernoative stamp, Miniature sheets,Souvinior sheet,first day cover, service stamp ची माहिती दिली.