संपन्न झालेले कार्यक्रम

२३ जुलै २०२१ गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम 'सन्मित्र मंडळ विद्यामंदिर' या शाळेत अतिशय उत्साहात पार पडला. 

🙏 नमस्कार  🙏

आपल्या शाळेत गुरूपोर्णिमेचा  कार्यक्रम शुक्रवारी तुकडीनिहाय संपन्न झाला.

प्रत्येक वर्गाच्या कार्यक्रमाच्या स्वरुपात थोडा-फार फरक होता. तथापि, त्या कार्यक्रमाचे एकंदरीत स्वरुप खालील प्रमाणे होते 👇

 

 

सन्मित्र मंडळ विद्या मंदिर     

                          गोरेगाव( पूर्व )

                   गुरुपौर्णिमा -व्यास पूजन

                          2021- 2022

दिनांक - 23 जुलै 2021.   

                           

--------------------------------------------------------------------

दिनांक 23 जुलै 2021 रोजी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम 'सन्मित्र मंडळ विद्यामंदिर' या शाळेत अतिशय उत्साहात पार पडला.

 

कोरोना च्या संकट काळात हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी त्यासाठी विशेष तयारी केली होती.

 

कार्यक्रमाची सुरुवात 'गुरुने दिला ज्ञानरूपी वसा' या प्रार्थनेने झाली. त्यानंतर व्यास प्रतिमेचे पूजन करून वंदन केले.

 

गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय मुख्याध्यापक श्री. गव्हाळे सर यांनी केले.

 

सरांचे प्रास्ताविक झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी गुरूपौर्णिमेचे महत्त्व, प्रार्थना, गुरु शिष्य जोड्या सांगितल्या तसेच गुरु चे महत्व सांगणारी गोष्ट सांगितली.

 

शाळेच्या माजी मा. मुख्याध्यापिका सौ. जोशी बाई यांनी मुलांना गुरुपदेश केला. त्यात त्यांनी मुलांना सांगितले की आपल्या सभोवती सगळीकडे गुरु आहेत. ते समजून घेऊन आपल्याला आपले ध्येय गाठता आले पाहिजे.

 

यानंतर मुलांना गुरु चिंतन ऐकवण्यात आले.

 

या सुंदर अशा कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने करण्यात आला.

 

अशा रीतीने गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

 

१९ जुलै २०२१  आषाढी एकादशीनिमित्त शाळेत विठ्ठल माउलींच्या पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

🙏 नमस्कार  🙏

 आषाढी एकादशीनिमित्त शाळेला सुट्टी असल्याने शाळेत विठ्ठल माउलींच्या पूजनाचा कार्यक्रम दिनांक १९ जुलैला संपन्न झाला त्याची काही छायाचित्रे 

२२ जुलै २०२१  सन्मित्र मंडळ , गोरेगाव शाळेचा निकाल  १०० % 

🙏 नमस्कार  🙏

 २२ जुलै २०२१  सन्मित्र मंडळ , गोरेगाव शाळेचा निकाल  १०० %