मागील कार्यक्रम
नोव्हेंबर २०१८
पुढील कार्यक्रम

संपन्न झालेले कार्यक्रम

  २५  नोव्हेंबर - २०१८

हीरक महोत्सवानिमित्त आयोजित आपल्या प्राथमिक विभागाची आंतरशालेय रनिंग डिक्टेशन स्पर्धा (३री आणि ४थी) रविवार दिनांक २५/११/२०१८ रोजी माधव सभागृहात ११.३० ते १.३० या वेळेत नियोजनानुसार पार पडली.  स्पर्धेत एकूण ९ शाळांनी सहभाग घेतला .

 

 स्पर्धेचे पर्यवेक्षण आणि परीक्षण करण्यासाठी गोरेगाव मधीलच श्रीम. मिता ओक, श्रीम.आसावरी बापट, श्रीम.मेधा परांजपे यांनी मोलाचे सहकार्य केले. गुलाबपुष्प आणि आभाराचे पत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले .  स्पर्धेसाठी उपस्थित विद्यावर्धिनी आणि जिजामाता विद्यामंदिर शाळेच्या शिक्षकांकडून तिसरीच्या इंग्रजीच्या पाठयपुस्तकातून ५० शब्द काढून घेतले . त्याच शब्दांच्या तीन याद्या तयार केल्या .

 

ही स्पर्धेची सर्व तयारी झाल्यानंतर संयुक्त कार्यवाह श्री. प्रशांत आठले यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून स्पर्धेस सुरुवात झाली .

 

 स्पर्धेचे स्वरूप - 

एका वेळी स्पर्धेच्या ठिकाणी तीन शाळांच्या जोड्या घेण्यात आल्या. जोडीतील एकाने धावत जाऊन यादीतील शब्द पाहून यायचे आणि आपल्या जोडीदाराला सांगायचे व जोडीदाराने ते न चुकता पटपट लिहायचे. तीन मिनिटात स्पेलिंग्ज न चुकवता जास्तीत जास्त शब्द लिहिणाऱ्या विजेत्या तीन जोड्या निवडायच्या .

 

 यानुसार स्पर्धा पार पडल्यानंतर तिन्ही परीक्षकांनी मिळून शब्दांचे कागद तापासले व निकाल तयार करून आपल्याकडे दिला . सहभाग प्रमाणपत्रे ,क्रमांक प्रमाणपत्रे ,रोख रकमेची बक्षिसांची पाकिटे तयार झाल्यानंतर लगेचच बक्षीस समारंभ घेण्यात आला .   विजेत्या जोड्याना संयुक्त कार्यवाह श्री. प्रकाशजी नानिवडेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्रे व रोख रकमेची पाकिटे देऊन गौरविण्यात आले. सहभागी सर्व विद्यार्थ्याना सहभाग प्रमाणपत्रेही देण्यात आली .

 

स्पर्धेस उपस्थित सर्व विद्यार्थ्याना बिस्कीट पुडा तसेच पालक -शिक्षकांना चहा बिस्किटे अल्पोपहार म्हणून देण्यात आले .  कु .सिद्धी हीने सुंदर रांगोळी काढून सहकार्य केले . ३० नोव्हेंबर रोजी होण्याऱ्या स्पर्धेची सूचना सांगून आणि उपस्थित सर्वांचे आभार मानून स्पर्धेची सांगता मुख्या. श्रीम. सावंत यांनी केली .