संपन्न झालेले कार्यक्रम

१ मे महाराष्ट्र दिन - आनंदयात्री स्मरणसकाळ

महाराष्ट्र दिन - आनंदयात्री स्मरणसकाळ

१ मे २०१९ रोजी सन्मित्र मंडळ विद्यामंदिर गोरेगाव (पू) येथे महाराष्ट्र व जागतिक कामगार दिनानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. महाराष्ट्राचे कला व साहित्य विश्व समृद्ध करणारी व्यक्तिमत्त्वे म्हणजे सुप्रसिध्द गायक व संगीतकार सुधीर फडके, स्नेहल भाटकर, गीतरामायणकार ग.दि.माडगूळकर व आपल्या लेखणीने सर्वांना गदगदून हसवणारे पु. ल. देशपांडें यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. त्यानिमित्ताने संस्थेचे सन्माननीय सदस्य, तिन्ही विभागाचे मुख्याध्यापक, माजी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी पु. ल. चे वाऱ्यावरची वरात व ती फुलराणी यातील प्रसंग सअभिनय सादर करून श्रोत्यांची मने जिंकली तर इतरांनी काव्यवाचन, कथाकथन, भजन व विविध श्रवणीय गीते सादर केली. सर्वांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

 2019  :  सन्मित्र मंडळ, गोरेगाव 

वेबसाइट निर्मिती : प्रशांत जाधव / अजित वर्तक

संकल्पना - अमेय पेडणेकर

छायाचित्रे : मेघनाद गणपुले