संपन्न झालेले कार्यक्रम

२६ नोव्हेंबर २०२०- संविधान दिन

"संविधान दिन" -२६.११.२०२०

 

सन्मित्र मंडळ, गोरेगांव ह्या संस्थेतर्फे, " संविधान दिनाचा " कार्यक्रम सकाळी, ११.०० ते १२.३० ह्या वेळेत संपन्न झाला.

~ कोविद-१९ ह्या साथीच्या रोगामुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेऊन हा कार्यक्रम प्रत्यक्ष व ऑन-लाईन असा दोन्ही पद्धतीने संस्थेने आयोजित केला होता. ऑन-लाईन व्यवस्था संस्थेचे सदस्य श्री. निलेश ताटकर यांनी उत्तम रितीने संभाळली.

~ कार्यक्रमात, शालेय इमारतीत, प्रत्यक्ष ३५ उपस्थिती होती. त्यात शाळेतील शिक्षक, संस्थाचालक व समाजातील व्यक्ती होत्या. तर ऑन-लाईन जाॅइन होणा-यांची जास्तीतजास्त संख्या ६० होती. ह्यात सर्वसामान्य जनते बरोबरच शालेय विद्यार्थी व त्यांचे पालकही होते. व्यासपीठावर अध्यक्ष श्री. जयंतजी विद्वांस व प्रमुख वक्ते श्री. प्रशांतजी देशपांडे होते.

~ संस्थेचे संयुक्त कार्यवाह श्री. प्रशांत आठले यांनी सर्वांचे स्वागत केले व संविधानाने आपल्याला काय-काय दिले ह्याचा थोडक्यात उल्लेख आपल्या प्रास्ताविकात केला.

~ त्यांनी, अध्यक्ष व प्रमुख वक्ते यांना संविधान व श्री. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्याची विनंती केली.

~ सभागृहात एका उच्चासनावर संविधानाची प्रत व श्री. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवली होती. अध्यक्ष व प्रमुख वक्त्यांनी, तिथे जाऊन अभिवादन केले. तसेच, कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी आपापल्या जागेवर उभे राहून संविधान व श्री. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

~ संविधानाच्या प्रस्तावनेचे सामुदायिक वाचन झाले.
माध्यमिकच्या शिक्षिका सौ. पगारेबाई, संविधानाच्या प्रस्तावनेतील एक-एक ओळ वाचत गेल्या आणि त्यांच्या मागून उपस्थित सर्वांनी ती ओळ परत म्हटली.

~ संस्थेचे सदस्य श्री. प्रफुल्ल कोंडेकर यांनी प्रमुख वक्ते श्री. प्रशांतजी देशपांडे यांचा परिचय करून दिला.

~ श्री. निलेश ताटकर यांनी आपल्या सुरेल आवाजात 'संविधान गौरव गीत' सादर केले.~ प्रमुख वक्ते श्री. प्रशांतजी देशपांडे यांचे सुरेख उद्बोधन झाले. त्यांनी आपल्या सुमारे ४० मिनिटांच्या भाषणात, घटना समितीची सुरुवात कशी झाली हे सांगितले.

संविधान, त्याचे महत्व, त्यातील मुख्य मुख्य तरतुदी ह्या सोप्या शब्दात मांडल्या. त्याचप्रमाणे, संविधानाचे प्रास्ताविक, त्याचे महत्व, संविधानात झालेले बदल ह्या सगळ्या गोष्टी सर्वसामान्यांना समजतील अशा सोप्या करून सांगितल्या.
संविधानातील तरतुदींचे महत्व लोकांपर्यंत पोहोचावे, म्हणून आपण काय-काय उपक्रम करू शकतो, ह्या संबंधी त्यांनी मार्गदर्शन केले.

~ त्यांच्या उद्बोधनामुळे, उपस्थितांच्या मनात, संविधान आणि त्यातील तरतूदींविषयी आस्था निर्माण होण्यास मदत झाली.

~ श्री. बाबासाहेब आंबेडकर, हे किती तत्त्वनिष्ठ होते, ह्याचा श्री. दत्तोपंत ठेंगडीजींच्या पुस्तकातील एक किस्सा, श्री. प्रशांत आठले यांनी सांगितला.

~ आपल्या अध्यक्षीय भाषणात, श्री. जयंतजी विद्वांस यांनी देशोदेशींच्या संविधानांचा तसेच देश-विदेशी घडणा-या घटनांचा उल्लेख करत, आपले संविधान हे कसे वेगळे आणि चांगले आहे, ह्याची माहीती दिली.
आपल्या देशातील काही प्रसिद्ध उद्योगपतींच्या वक्तव्याचा उल्लेख करत, हे अधोरेखित केले की, आपले संविधान, आचार, विचार आणि उच्चार स्वातंत्र्य ह्याची मुभा देते.
विद्वांस यांनी, आपल्या छोट्या पण मुद्देसूद भाषणाने, आपल्या संविधानाचे वेगळेपण श्रोत्यांना पटवून दिले.

~ आभार प्रदर्शनाने, ह्या सोहळ्याची सांगता झाली.