संपन्न झालेले कार्यक्रम

३१ जुलै २०२० - सौ. मेधा थोटम - सेवानिवृत्ती समारोह

३१ जुलै २०२० - सौ. मेधा थोटम - सेवानिवृत्ती समारोह - आपण दिलेल्या सेवेबद्दल आपले आभार व निवृत्तीनंतरच्या वाटचालीसाठी शुभेच्छा !!
    
सौ. मेघा थोटम संक्षिप्त माहिती

शिक्षण : बी. ए.बी.एड्.
अध्यापनाचे विषय : मराठी, हिंदी, चित्रकला
नेमणूक : ०१/०७/१९९६
आवड / छंद : हस्तकलेच्या नाविन्यपूर्ण वस्तू तयार करणे
मुलांसाठी संदेश : यशस्वी व्हायचे असेल तर सुरुवात एकटयाने करावी लागते. जेव्हा तुम्ही जिंकू लागता तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात.

समोरह वृत्त -
आज सौ. मेधा थोटम ह्यांचा सेवेतील शेवटचा दिवस. मंडळाच्या प्रथेप्रमाणे आज सेवानिवृत्ती समारोह सर्व लॉकडाऊन चे नियम पाळून सरका करण्यात आला.

चंद्बाा्ते बाईंनी नेहमीप्रराणे छान रांगोळी काढली होती आणि सजावट केली होती. थोटम बाईंच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून ११:४५ वा कार्यक्रमाला सुरुवात झाली.

मोरे बाईंनी प्रास्ताविक केले, त्या नंतर मोरे आणि पगारे बाईनी सुंदर गीत सदर केले. पगारे बाई आणि भावसार बाई ह्यांनी थोटम बाईंची ओटी भरून त्यांचा सत्कार केला. जुन्या ग्रुप फोटोंचे शुभेच्छा पत्र ही दिले.

संस्थेच्या वतीने संयुक्त कार्यवाह प्नााशजी करनिवडेकर बोलले. त्यांनी दिवसाचे महत्व म्हणून हा कार्यक्रम आज केला पण लाॅकडाऊन संपल्यावर मोठा कार्यक्रम होईल असे सुचित केले. थोटम बाईंना निवृत्त जीवन सुखी,आनंददायी व आरोग्यसंपन्न जावो ही सदिच्छा व्यक्त केली.

थोटम बाईंनी उत्तरादाखल संस्थेचे, शाळेचे व सर्व सहकार्यांचे आभार मानले उपस्थित सर्वांची नावे घेऊन कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या बद्दल कौतुक केले. थोटम बाईंनी सर्वांना स्वतः केलेली छान फुले व राख्या दिल्या ,खाऊ दिला व
संस्थेप्रति कृतज्ञता व्यक्त करत विस हजार रुपयांची देणगीही जाहीर केली.

ह्या कार्यक्रमास थोटम बाईंचा मुलगाही उपस्थित होता व त्यानेही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची काही क्षणचित्रे.