संपन्न झालेले कार्यक्रम

मागील कार्यक्रम
पुढील कार्यक्रम

१५ जून २०२० - बै. जी. प्राथमिक शाळा- मुख्याध्यापक - श्रीमती वैशाली सावंत.

१५ जून २०२० - बै. जी. प्राथमिक शाळा- मुख्याध्यापक - श्रीमती वैशाली सावंत.

सन्मित्र मंडळ संचालित बैरामजी जीजीभॉय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काल दिनांक १५ जून २०२० रोजी शैक्षणिक वर्ष २०२०/२०२१ मधील शालेय पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. नियोजन व्यवस्थित पार पडावे तसेच आॅनलाईन शिक्षण सुरू करण्यासाठी व शैक्षणिक कामांसाठी लागणारे शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर सहकारी व मुख्याध्यापक काल शाळेत हजर होते.

इयत्ता पहिली ते चौथीचे एकूण १२७ पालक पाठ्यपुस्तके घेण्यासाठी हजर होते. कोविड-१९ या आजाराची लागण संपर्कातून होऊ नये म्हणून शासकीय सर्व नियमांचे पालन केले गेले व पाठ्यपुस्तके वितरण व्यवस्थित पार पडले.