संपन्न झालेले कार्यक्रम

मागील कार्यक्रम
पुढील कार्यक्रम

२ ८ फेब्रुवारी २०२० - विज्ञान दिनाचा कार्यक्रम वृत्तांकन - सौ. धस बाई

दि. २८.फेब्रुवारी २०२० रोजी विज्ञान दिनाचा कार्यक्रम 4.30 वाजता सुरु झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. धस बाई यांनी केले. या कार्यक्रमाला मा. प्रमुख पाहुणे व शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. श्रिया इंगळे, शाळेचे मा.मुख्याध्यापक श्री गव्हाळे सर, मा. पर्यवेक्षक सौ मोरे बाई व ज्येष्ठ शिक्षक श्री. गावडे सर उपस्थिती होते.
सुरुवातीला दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन, शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. शालेय प्रार्थना व स्वागत गीत सादर झाले. मा. मुख्याध्यापकांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. तसेच विज्ञान दिनाचे महत्त्व सांगितले. सर्वांनी विज्ञान निष्ठ व विज्ञान प्रेमी होण्यासाठी शोधक वृत्तीची गरज असणे आवश्यक आहे असे सर्वांना सांगितले.
विज्ञान मंडळा तर्फे विविध स्पर्धा घेण्यात आल्या ती बक्षिसे मा. प्रमुख पाहुणे व मा. मुख्याध्यापक श्री गव्हाळे सर, मा. पर्यवेक्षिका सौ. मोरे बाई, ज्येष्ठ शिक्षक श्री गावडे सर यांच्या हस्ते देण्यात आली.
विज्ञान गीत, शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांची माहिती व मंगळयानाविषयी माहिती ध्वनीचित्रफितीच्या साहाय्याने दाखवण्यात आली. तसेच पाहुण्यांनी आपले मनोगत मांडताना प्रत्येक गोष्टी मागचे कारण काय याची प्रश्नावली मला देण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. नंतर मा. मुख्याध्यापक श्री गव्हाळे सर यांच्या हस्ते मा. प्रमुख पाहुण्यांना पुष्प गुच्छ देण्यात आले.
सौ. जाधव बाईनी प्रमुख अतिथींचे आभार मानले आणि विज्ञान गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

2 फेब्रुवारी २०२० - आंतरशालेय नेहरू विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत सन्मित्र शाळेचा द्वितीय क्रमांक.

2 फेब्रुवारी २०२० - आंतरशालेय नेहरू विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत सन्मित्र शाळेचा द्वितीय क्रमांक.

वरळी येथील नेहरु विज्ञान केंद्र, आणि रोटरी कल्ब यांनी संयुक्तरित्या मुंबई, विरार, ठाणे येथील शाळांकरीता आयोजित केलेल्या विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत या वर्षीही सन्मित्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी व्दितीय क्रमांक पटकावला.

अंतिम फेरीत प्रवेश करण्याचे आपले हे सलग ५ वे वर्ष. मागील वर्षीही आपण उपविजेते होतो. त्याआधी सलग ३ वर्षे विजेते होतो.

प्राथमिक लेखी परीक्षेत मुंबई,विरार व ठाणे शहर विभागातील १०० च्या वर शाळांनी भाग घेतला होता. मौखिक प्रश्नांच्या विविध टप्प्यांवरील स्पर्धांमधून आपली शाळा अंतिम फेरीत पोहोचली.

कु. यशस्वी यशवंत खैरे(10वी), कु. मानसी अंकुश खरात (10वी),कु. अनुजा प्रशांत सोमण (9वी) व कु. रूद्र राजन जोशी (8 वी) या विद्यार्थ्यांनी शाळेचे प्रतिनिधित्व करून शाळेला द्वितीय क्रमांक मिळवून दिला.
या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या शिक्षकांनी (सौ. कदम व श्री. गोरे) मोलाचे मार्गदर्शन केले.

सर्वांचे हार्दिक अभिनंदन !!!

२७ फेब्रुवारी २०२० - मराठी राजभाषा दिन - शब्दांकन - सौ. भाग्यलक्ष्मी इंजामुरी.

दि. २७.फेब्रुवारी २०२० रोजी मराठी राजभाषा दिनाचा कार्यक्रम दु.1 वाजता सुरु झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले. शाळेतील मा.मुख्याध्यापक श्री.गव्हाळे सर व मा.पर्यवेक्षिका सौ. मोरे बाई यांनी दीप प्रज्वलित करून कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन केले.
शालेय प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली व ६ब ची कु.शर्वरी जोशी हिने आपल्या नृत्यद्वारे ईशस्तवन सादर केले.


मा. मुख्याध्यापक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सरांनी या प्रास्ताविकेत मराठी राजभाषेचे महत्व व साजरा करण्यामागचा हेतू ,मराठी भाषेच्या संवर्धनासाठी व प्रचारासाठी आपण झटले पाहिजे. आजपासून आपण कोठेही गेलो, तरी कोणाशीही संवाद साधताना मराठी भाषेचा वापर करूया असा संकल्प करायला सांगितले.


७ ब ची हर्षिता चव्हाण हिने कुसुमाग्रजांची माहिती सांगितली. त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. उदा. नृत्य, मराठी गीत, काव्यवाचन, चारोळ्या, पोवाडा, शिवगर्जना असे विविध कार्यक्रम विद्यार्थ्यांनी उत्साहाने सादर केले. काही विद्यार्थ्यांनी कोकणी व अहिराणी भाषेचे संवाद एकपात्री नाटकाद्वारे सादर केले.

ग्रंथालयातील अधिक पुस्तकांचे वाचन करणाऱ्या विद्यार्थ्याना श्रीम. चंद्रात्रे बाईकडून मा. श्री गव्हाळे सरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले त्यानंतर श्रीम. चंद्रात्रे बाई यांनी काव्य- वाचन केले. सौ. चेतना बाईनी एक बालगीत सादर केले.

मा.पर्यवेक्षिक सौ. मोरे बाईनी आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे कौतुक केले व सर्वांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

सौ. मांजरेकर बाईनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सौ. जाधव बाईनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने झाला.
अशा रितीने मराठी राजभाषा दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला.