संपन्न झालेले कार्यक्रम

मागील कार्यक्रम
पुढील कार्यक्रम

२४ नोव्हेंबर २०१९- सन्मित्रची हिरकणी ""अक्षता सुनिल होरंबे

सन्मित्रची हिरकणी ""अक्षता सुनिल होरंबे - वयाच्या ११ व्या वर्षी सर केला १५० फूट उंचीचा हडबीच्या शेंडीचा म्हणजेच thump_sup सुळका.....!!

अक्षता सुनिल होरंबे वय वर्षे अवघे ११,सन्मित्र मंडळ विद्यामंदिर,गोरेगाव(पू)मुंबई या शाळेत इयत्ता ६ वीत शिकणारी मुलगी.कोणतेही काम जिद्दी आणि चिकाटीने पूर्ण करण्याची तिच्यात असलेली धमक आज पूर्णत्वास आली.वडील महाराष्ट्र सुरक्षा बलात नोकरी करत असून ते स्वतः एक उत्तम गिर्यारोहक,समाजसेवक आणि सर्पमित्र असल्यामुळे तिचीही पावले आपसूकच आपल्या वडिलांबरोबर या क्षेत्रात वळू लागली,शाळेत अभ्यासाबरोबर तिने कराटे खेळत उत्तम प्रगती केली असून तिने आतापर्यंत वेगवेगळ्या खेळात प्रथम पुरस्कार प्राप्त करून सुवर्णपदक,रौप्यपदक,कास्यपदक पटकावलेली आहेत.खेळातील अनुभव आणि गिर्यारोहणाची जिद्द यामुळे २४/११/२०१९ रोजी प्रथमच तिने आपल्या वडिलांसोबत वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी मनमाड येथील हडबीची शेंडी उर्फ थम्सअप हा १५० फुटाचा सुळका माथा गाठून त्यावर तिरंगा फडकवून यशस्वीपणे सर केला,एवढया कमी वयात आणि कठिण अश्या समजल्या जाणाऱ्या या सुळक्यावर प्रथमच एका मुलीने असे प्रस्तरारोहण केले असल्यामुळे सर्व गिर्यारोहकांकडून तिचे कौतुक होत आहे.

२४ नोव्हेंबर २०१९ रोजी अक्षतास पुणे येथे माता राजमाता जिजाऊ पुरस्कार घेण्यासाठी तिला तिच्या कुटुंबासह आमंत्रित करण्यात आले होते,परंतु तिथे न जाता तिने हडबीच्या शेंडीचे आव्हान स्वीकारले आणि तिने ते माथा गाठून यशस्वीरीत्या पूर्णही केले,यापूर्वीही तिने आपल्या वडिलांसोबत टकमक,त्रिंगलवाडी, कोहोज, कळसुबाई,गंभीरगड,लेण्याद्री ते हटकेश्वर इ.ट्रेक यशस्वीपणे पूर्ण केलेले आहेत.यावेळी तिला पॉईंट ब्रेक अडव्हेंचर ग्रुपचे श्री दत्ता साळुंखे उर्फ जॉकीदादा सर, श्री तुषार पाटील सर,त्यांचे टीमसहकारी श्री बनी, श्री अमोल यांचे मार्गदर्शन गिर्यारोहण करणाऱ्या टीममधील तिचे वडील सुनिल होरंबे, सहकारी दिप नाचनकर,सिद्धेश आणि सौ श्रद्धा बेडिस्कर, शुभम चित्ते,प्रज्ञानंद कदम यांचे प्रोत्साहन मिळाले. लवकरच म्हणजे दिनांक ०१ डिसेंबर २०१९ रोजी तीला डोंबिवली येथे महात्मा गांधी दर्शन पुरस्कार मिळणार असून आज तिला माता राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात आला,तिने या कमी वयात १५० फुटाचा thumsup(हडबीची शेंडी) हा सुळका सर केल्यामुळे सर्वत्र या हिरकणीचे कौतुक होत आहे.

११ नोव्हेंबर २०१९- त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव

११ नोव्हेंबर २०१९-  त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव
बैरामजी जीजीभॉय प्राथमिक शाळेत दीपोत्सव साजरा करण्यात आला.
या निमित्त पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी कागदावर 8 ठिपक्यांची रांगोळी काढून रंगवणे ही स्पर्धा घेण्यात आली. 3री आणी 4थी च्या विद्यार्थ्यांसाठी 10 ते 12 ठिपक्यांची प्रत्यक्ष रांगोळी काढून रंग भरणे आणी आकाशकंदील बनवणे या स्पर्धा घेण्यात आल्या.


या स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग होता. विद्यार्थ्यांनी बनवलेले आकाशकंदील व त्यांच्या रांगोळ्यांचे प्रदर्शन लावण्यात आले. विद्यार्थ्यांबरोबर सर्व शिक्षिकांनी सुद्धा छान रांगोळी काढली. संध्याकाळी 7 नंतर संपूर्ण पटांगणात पणत्यांची रोषणाई करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कलाकुसरीने सजलेल्या, दिव्यांच्या रोषणाईने झळाळत्या पटांगणाचा आसमंत सनईच्या सुरांनी दुमदुमला.


त्रिपुरासुराची कथा व दीपोत्सवाचे महत्त्व समजून घेतल्यावर विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहिले. चिवडा व लाडूचा खाऊ त्यांना देण्यात आला. मंडळाच्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी व सर्व पालकांनी प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अशा प्रकारे दीपोत्सव साजरा करून संध्याकाळी 7.30 वाजता कार्यक्रमाची सांगता झाली.