संपन्न झालेले कार्यक्रम

४ फेब्रुवारी २०२१ सेवागौरव समारंभ - उत्सवमुर्ती- श्रीमती भाग्यलक्ष्मी इंजमुरी

🙏 सेवागौरव समारंभ - उत्सवमुर्ती- श्रीमती भाग्यलक्ष्मी इंजमुरी 🙏

आपल्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. इंजमुरी बाई 32 वर्ष सेवा देऊन दिनांक 31 जानेवारी 2021 रोजी निवृत्त झाल्या. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री जोशी सर, संयुक्त कार्यवाह माननीय श्री नानिवडेकर सर आणि व्यवस्थापक माननीय श्री कोंडेकर सर उपस्थित होते. संस्थेचे माननीय सदस्य श्री सोहनी सर उपस्थित होते . माध्यमिक विभागाचे माननीय मुख्याध्यापक श्री गव्हाळे सर ,माननीय पर्यवेक्षिका सौ. मोरे बाई, प्राथमिक विभागाच्या माननीय मुख्याध्यापिका सौ.सावंत बाई व पूर्व प्राथमिक विभागाच्या माननीय मुख्याध्यापिका सौ.भावे बाई , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

श्रीमती चंद्रात्रे बाईनी नेहमीप्रमाणे छान रांगोळी व सजावट केली होती. कार्यक्रमाची सुरुवात ठीक 10.15 वा. झाली.सौ.इंजमुरी बाईंच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. प्रार्थना गाऊन झाल्यानंतर माननीय मुख्याध्यापक श्री गव्हाळे सर यांनी प्रास्ताविक केले. शाळेच्या प्रथेप्रमाणे सौ. तांबे बाई व सौ. माने बाईनी सौ.इंजमुरी बाईंची ओटी भरून सत्कार केला. श्री. गावडे सर यांच्या हस्ते "श्री. स्वरुप इंजमुरी" सरांना शर्टपीस देण्यात आले.

सन्मित्र मंडळाकडून अध्यक्ष माननीय श्री.जोशी सर व संयुक्त कार्यवाह माननीय श्री. नानिवडेकर सरांकडून सौ.इंजमुरी बाईंना शाल, श्रीफळ ,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले. तसेच सर्व सन्मित्र परिवाराकडून (माध्यमिक ,प्राथमिक व पूर्व प्राथमिक) त्यांना भेटवस्तू देण्यात आली .

उत्सवमूर्ती च्या मानपत्राचे वाचन सौ.गावडे बाईंनी केले . सौ. मोरे बाईंनी सौ. इंजमुरे बाईंचे आवडते गाणे सुरेल आवाजात गायले.यानंतर शिक्षिका सौ. लाड बाई ,माध्यमिक विभागाचे श्री. गावडे सर, सौ. भावसार बाई,सौ.मांजरेकर बाई,श्रीम. चंद्रात्रे बाई, सौ.जाधव बाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन करताना सौ. धस बाईंनी मनोगत व्यक्त केले.. त्याच प्रमाणे माननीय पर्यवेक्षिका सौ. मोरे बाई, माननीय मुख्याध्यापक श्री .गव्हाळे सर व माननीय कोंडेकर सर यांनी मनोगत व्यक्त केले. सर्वांनी इंजमुरी बाईंचे निवृत्त जीवन हे सुखी, समृद्धी, आरोग्यदायी ,आनंदी जावो ही सदिच्छा व्यक्त केली.


श्री इंजमुरी सरांनी ही मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष माननीय श्री. जोशी सरांनी उत्सवमूर्तीच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सौ.इंजमुरी बाईंनी मनोगत व्यक्त करताना हीरक महोत्सवाच्या वेळी माजी विद्यार्थ्यांनी दिलेला मान व ध्वजारोहण करण्याचा मिळालेला सर्वोच्च सन्मान या आठवणीने त्या भावूक झालेल्या होत्या. संस्थेचे,शाळेचे व सर्व सहकारी यांचे त्यांनी आभार मानले .संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करून संस्थेला देणगी दिली. संस्थेचे संयुक्त कार्यवाह माननीय श्री.नानिवडेकर सरांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाची सांगता सुश्राव्य गीताने झाली.अशाप्रकारे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला
🙏

 2019  :  सन्मित्र मंडळ, गोरेगाव 

वेबसाइट निर्मिती : प्रशांत जाधव / अजित वर्तक

संकल्पना - अमेय पेडणेकर

छायाचित्रे : मेघनाद गणपुले